Marriages are made in heaven and celebrated on earth.

संकल्प... द्रृष्टीक्षेपा अलीकडचे आणि पलीकडचे...


काय मंडळी; झाली का नवीन वर्षासाठीच्या संकल्पांची यादी तयार?

खाजगी आयुष्य असो अथवा व्यवहारिक आयुष्य, संकल्प बर्याचदा महत्वाची भूमिका वठवतात (अर्थातच आत्मसात केलेले आणि नित्यनियमाने राबविलेले संकल्प).

आपल्या सर्वांसारखेच दरवर्षा प्रमाणे मी देखील २०१७ साठी बर्याच नवीन अन् काही जुन्या अशा संकल्पांची यादी करून तयार आहे. बघुया ह्या वर्षी किती प्रयत्नशील राहणे शक्य होते ते..., असो.

द्रृष्टीक्षेपा अलीकडचे आणि पलीकडचे आपले सर्व संकल्प, स्वप्ने २०१७ मधे पुर्ण होवोत.

नुतनवर्षाभिनंदन...!

सुंदर ते बालपण...



विहान आणि ध्रुव मधल्या चर्चेचा एक छानसा क्षण मला टिपता आला. नेमकी काय चर्चा चाललेली हे मला निटसे झेपले नाही परंतु काहीतरी गम्मत-जम्मत किंवा खोडकर क्रुत्य करण्याचा मनसुबा असावा असे एकंदरीत मला जाणवले.
दोघांमधील तो निरागसपणा बरेच काही सांगुन जातो. क्षणभर माझे बालपण माझ्या डोळ्यांसमोर उभे राहीले. माझ्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा मोह मला आवरता आला नाही.
खरच खुप मजा असते लहानपणी, कधीही हसा, कधीही रडा, कधीही खा-प्या, कुठलीही चिंता नाही, कुठलेच ताण-तणाव नाहीत, एकदम बिनधास्त होऊन आपले आयुष्य जगता येते. म्हणुनच म्हटले आहे लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...
ध्रुव आणि विहान च्या रूपाने पुन्हा एकदा बालपणाचा आस्वाद घेता येतोय ह्याचा आनंद आहे. खरच; सुंदर ते बालपण...

YogVaish's 4th Wedding Anniversary

२४ एप्रिल २०१६ (फाल्गुन-चैत्र, शके १९३७-१९३८)

Marriages are made in heaven and celebrated on earth.

ह्या वेब लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
- योग्वैश :)