विहान आणि ध्रुव मधल्या चर्चेचा एक छानसा क्षण मला टिपता आला. नेमकी काय चर्चा चाललेली हे मला निटसे झेपले नाही परंतु काहीतरी गम्मत-जम्मत किंवा खोडकर क्रुत्य करण्याचा मनसुबा असावा असे एकंदरीत मला जाणवले.
दोघांमधील तो निरागसपणा बरेच काही सांगुन जातो. क्षणभर माझे बालपण माझ्या डोळ्यांसमोर उभे राहीले. माझ्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा मोह मला आवरता आला नाही.
खरच खुप मजा असते लहानपणी, कधीही हसा, कधीही रडा, कधीही खा-प्या, कुठलीही चिंता नाही, कुठलेच ताण-तणाव नाहीत, एकदम बिनधास्त होऊन आपले आयुष्य जगता येते. म्हणुनच म्हटले आहे लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...
ध्रुव आणि विहान च्या रूपाने पुन्हा एकदा बालपणाचा आस्वाद घेता येतोय ह्याचा आनंद आहे. खरच; सुंदर ते बालपण...